तुम्ही डेव्हलपर आहात का?
तुमची Chrome अॅप्स प्रकाशित करणे हे कराआम्ही आमच्या सेवा अटी २७ जानेवारी २०२४ रोजी अपडेट केल्या आहेत. अधिक माहितीसाठी, आम्ही मुख्य बदलांचा सारांशदेखील खाली दिला आहे.
१.१ Google Chrome वेब स्टोअर (“वेब स्टोअर”) वापरून, तुम्ही https://policies.google.com/terms वरील Google सेवा अटी, https://policies.google.com/privacy वरील Google गोपनीयता धोरण आणि या वेब स्टोअर सेवा अटी (एकत्रितपणे “अटी” असे म्हणतात) स्वीकारता आणि सहमती दर्शवता, की तुम्ही त्यांच्या अधीन आहात.
१.२ Google Chrome च्या अनुषंगाने वापरण्यासाठी, तुम्ही उत्पादने (म्हणजेच Google Chrome च्या अनुषंगाने वापरण्यासाठी तयार केलेले आणि वेब स्टोअर द्वारे वितरित केले जाणारे सॉफ्टवेअर, आशय व डिजिटल आशय) ब्राउझ करण्याकरिता, शोधण्याकरिता आणि डाउनलोड करण्याकरिता वेब स्टोअर वापरू शकता. यांपैकी काही उत्पादने ही Google ने ऑफर केलेली असू शकतात आणि इतर उत्पादने ही Google शी संलग्न नसलेल्या तृतीय पक्षांद्वारे उपलब्ध केलेली असू शकतात. तुम्ही सहमती दर्शवता, की वेब स्टोअर वर Google व्यतिरिक्त इतर स्रोतावरून मिळणारे कोणतेही उत्पादन यासाठी Google जबाबदार नाही.
१.३ तुम्ही (१) सहमती दर्शवणे किंवा स्वीकारणे हे पर्याय जिथे उपलब्ध आहेत, त्यावर क्लिक करून अथवा (२) प्रत्यक्षात वेब स्टोअर अॅप्लिकेशन किंवा वेब सेवा वापरून अटी स्वीकारू शकता.
१.४ वेब स्टोअर वापरण्यासाठी तुमचे वय १३ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तुमचे वय १३ ते १८ वर्षांदरम्यान असल्यास, वेब स्टोअर वापरण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या पालकाची किंवा कायदेशीर पालकाची परवानगी असणे आवश्यक आहे.
२.१ तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्हाला आगाऊ नोटिस न देता Google त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, तुम्हाला किंवा सर्वसाधारणपणे वापरकर्त्यांना वेब स्टोअर (अथवा वेब स्टोअर मधील कोणतीही वैशिष्ट्ये) ची सुविधा देणे (कायमचे किंवा तात्पुरते) थांबवू शकते.
२.२ तुम्ही सहमती दर्शवता, की Google ने तुमच्या खात्याचा अॅक्सेस बंद केल्यास तुम्हाला वेब स्टोअर, तुमच्या खात्याचे तपशील किंवा तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केलेल्या कोणत्याही फाइल अथवा इतर उत्पादने अॅक्सेस करण्यापासून रोखले जाऊ शकते.
२.३ (उत्पादने कशी शोधावीत, डाउनलोड करावीत आणि काढून टाकावीत याच्या समावेशासह) वेब स्टोअर वापरण्यासाठी व ते काम करण्यासाठी लागणारा सपोर्ट हा वेब स्टोअर अॅप्लिकेशनच्या यूझर इंटरफेसमध्ये Google द्वारे पुरवला जातो. वेब स्टोअर वर डेव्हलपर यांद्वारे वितरित केलेली उत्पादने यांसाठी Google हे ग्राहक सपोर्ट देत नाही. प्रत्येक डेव्हलपर हा तो देत असलेल्या ग्राहक सपोर्टचा दर्जा निर्धारित करण्यासाठी जबाबदार असतो आणि तुम्ही त्याच्याशी थेट संपर्क साधावा.
३.१ वेब स्टोअर मधील विशिष्ट सेवा अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही तुमचे नाव, ईमेल अॅड्रेस, Google खाते माहिती, पत्ता आणि बिलिंगचे तपशील यांसारखी तुमची स्वतःविषयीची माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्ही Google ला दिलेली यासारखी कोणतीही माहिती नेहमी अचूक, योग्य आणि अप टू डेट असेल.
३.२ फक्त (अ) अटी आणि (ब) संबंधित अधिकार क्षेत्रातील कोणताही लागू कायदा, नियमन किंवा सर्वसाधारणपणे स्वीकारल्या जाणार्या पद्धती किंवा मार्गदर्शक तत्त्वे यांनी परवानगी दिलेल्या उद्देशांसाठी वेब स्टोअर वापरण्याकरिता तुम्ही सहमती दर्शवता. तुम्ही युनायटेड स्टेट्स वाणिज्य विभागाची निर्यात प्रशासन नियमने आणि युनायटेड स्टेट्स ट्रेझरी विभागाच्या ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोलद्वारे संचालित केलेल्या मंजुरी प्रोग्रामच्या समावेशासह पण त्यापुरते मर्यादित नसलेले, एक्सपोर्टसंबंधित सर्व लागू नियंत्रणांचे पालन करण्यास सहमती दर्शवता. वेब स्टोअर वापरून तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि हमी देता, की यू.एस. किंवा एक्सपोर्टसंबंधित लागू असलेल्या इतर कायद्यांच्या अंतर्गत तुम्ही एक्सपोर्ट अथवा सेवा मिळवण्यास प्रतिबंधित नाही. उत्पादने डाउनलोड करणे, इंस्टॉल करणे आणि/किंवा त्यांच्या वापरासंबंधित सर्व स्थानिक कायद्यांचे व नियमांचे पालन करण्यास तुम्ही सहमती दर्शवता.
३.३ तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्हाला Google शी स्वतंत्रपणे केलेल्या करारानुसार विशेषतः अनुमती नसल्यास, तुम्ही Google द्वारे पुरवलेल्या इंटरफेसव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने वेब स्टोअर अॅक्सेस (किंवा अॅक्सेस करण्याचा प्रयत्न) करणार नाही. तुम्ही स्पष्टपणे सहमती दर्शवता, की कोणत्याही ऑटोमेडेट मार्गांनी (स्क्रिप्ट, क्रॉलर किंवा यांसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरासह) वेब स्टोअर अॅक्सेस (किंवा अॅक्सेस करण्याचा प्रयत्न) करणार नाही आणि वेब स्टोअर वेबसाइटवर असलेल्या कोणत्याही robots.txt फाइलमध्ये सेट केलेल्या सूचनांचे पालन करण्याची खात्री कराल.
३.४ तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्ही वेब स्टोअर मध्ये (किंवा वेब स्टोअर याच्याशी कनेक्ट केलेल्या सर्व्हर आणि नेटवर्कमध्ये) अडथळे किंवा व्यत्यय आणणार्या कोणत्याही अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणार नाही. तुम्ही सहमती दर्शवता, की वेब स्टोअर वर आढळणारी कोणतीही उत्पादने ही Google किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे ऑपरेट केल्या जाणार्या कोणत्याही सर्व्हर, नेटवर्क किंवा वेबसाइटमध्ये अडथळा अथवा व्यत्यय येईल अशाप्रकारे तुम्ही वापरणार नाही.
३.५ तुम्हाला Google शी केलेल्या स्वतंत्र करारामध्ये स्पष्टपणे परवानगी दिलेली नसल्यास, तुम्ही सहमती दर्शवता, की कोणत्याही उद्देशाने वेब स्टोअर ची पुनर्निर्मिती करणार नाही, त्याची डुप्लिकेट प्रत तयार करणार नाही, ते कॉपी करणार नाही, त्याची विक्री करणार नाही, त्याचा व्यापार करणार नाही किंवा त्याची पुनर्विक्री करणार नाही. तुम्हाला अशाप्रकारच्या उत्पादन याच्या डेव्हलपरशी केलेल्या स्वतंत्र करारामध्ये स्पष्टपणे परवानगी दिलेली नसल्यास, तुम्ही सहमती दर्शवता, की कोणत्याही उद्देशाने वेब स्टोअर ची पुनर्निर्मिती करणार नाही, त्याची डुप्लिकेट प्रत तयार करणार नाही, ते कॉपी करणार नाही, त्याची विक्री करणार नाही, त्याचा व्यापार करणार नाही किंवा त्याची पुनर्विक्री करणार नाही.
३.६ तुम्ही सहमती दर्शवता, की वेब स्टोअर व कोणतीही उत्पादने यांच्या तुमच्या वापरासाठी आणि अटी यांच्या अंतर्गत तुमच्या कर्तव्यांच्या कोणत्याही भंगासाठी व अशा कोणत्याही भंगाच्या परिणामांसाठी (Google ला होणारे कोणतेही नुकसान किंवा हानी यांसह) तुम्ही एकटे जबाबदार असाल (आणि Google तुमच्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार नसेल).
३.७ तुम्ही सहमती दर्शवता, की उत्पादने यांमध्ये लागू असलेले सर्व बौद्धिक संपदा अधिकार यांच्या अमर्याद समावेशासह वेब स्टोअर व त्याद्वारे उपलब्ध असलेली उत्पादने यांमधील आणि यांचे सर्व हक्क, शीर्षक व हित या गोष्टी Google आणि/किंवा तृतीय पक्षाच्या मालकीच्या आहेत. "बौद्धिक संपदा अधिकार" म्हणजेच पेटंट कायदा, कॉपीराइट कायदा, ट्रेड सीक्रेट कायदा, ट्रेडमार्क कायदा, अन्याय्य स्पर्धा कायदा या अंतर्गत असलेले कोणतेही व सर्व अधिकार आणि जगभरातील कोणतेही व इतर सर्व मालकी अधिकार. तुम्ही सहमती दर्शवता, की पुढील गोष्टी तुम्ही स्वतः करणार नाही आणि कोणत्याही तृतीय पक्षाला त्या करण्याची अनुमती देणार नाही (i) परवानगी नसल्यास उत्पादने कॉपी करणे, त्यांची विक्री करणे, त्यांचा परवाना देणे, ती वितरित करणे, ट्रान्सफर करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे, फेरबदल करणे, ती अनुकूल करणे, त्यांचे भाषांतर करणे, त्यांद्वारे साधित कार्ये तयार करणे, ती डीकंपाइल करणे, रिव्हर्स इंजिनियर करणे, डिसअसेंबल करणे किंवा त्यांमधून इतर प्रकारे सोर्स कोड मिळवण्याचा प्रयत्न करणे (ii) (डिजिटल अधिकार व्यवस्थापन अथवा फॉरवर्ड-लॉक कार्यक्षमतेच्या अमर्याद समावेशासह) उत्पादने यांमधील कोणत्याही कार्यक्षमतेद्वारे पुरवलेल्या, डिप्लॉय केलेल्या किंवा अमलात आणलेल्या सुरक्षा अथवा आशय वापर नियमांना, टाळण्यासाठी किंवा त्यांचे उल्लंघन करण्यासाठी कोणतीही कृती करणे, (iii) कोणत्याही कायद्याचे अथवा तृतीय पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन करून आशय अॅक्सेस करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी, ट्रान्सकोड करण्यासाठी किंवा पुन्हा प्रसारित करण्यासाठी उत्पादने वापरणे अथवा (iv) उत्पादने यांना जोडलेल्या किंवा त्यांमध्ये समाविष्ट असलेल्या, Google च्या अथवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या कॉपीराइट नोटिस, ट्रेडमार्क किंवा इतर मालकी हक्क नोटिस काढून टाकणे, अस्पष्ट करणे अथवा बदलणे.
३.८ Google हे वेब स्टोअर वरील कोणतेही किंवा सर्व उत्पादने यांचे प्री-स्क्रीन करण्याचे, त्याचे परीक्षण करण्याचे, ते फ्लॅग करण्याचे, ते फिल्टर करण्याचे, त्यामध्ये सुधारणा करण्याचे, ते नाकारण्याचे किंवा काढून टाकण्याचे हक्क राखून ठेवते (पण त्यांच्यावर कोणतेही बंधन नसेल). तरीही, तुम्ही सहमती दर्शवता, की वेब स्टोअर वापरल्यामुळे तुम्हाला कदाचित आक्षेपार्ह, असभ्य किंवा प्रक्षोभक वाटणारी उत्पादने यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जोखमीवर वेब स्टोअर वापरता.
३.९ रिटर्न: तुम्ही वेब स्टोअर वरून खरेदी केलेली कोणतीही उत्पादने रिटर्न करण्यासाठी, सर्व लागू शुल्कांच्या पूर्ण परताव्याकरिता ती खरेदी केल्यापासून (डाउनलोड केल्यापासून नाही) तुमच्याकडे ३० मिनिटे आहेत. तुम्ही खरेदी केलेले एखादे उत्पादन एकदाच रिटर्न करू शकता; तुम्ही त्यानंतर तेच उत्पादन खरेदी केल्यास, तुम्ही ते दुसर्या वेळी रिटर्न करू शकत नाही. उत्पादन रिटर्न करण्याचा पर्याय उपलब्ध असेल तिथे तो तुमच्यासाठी वेब स्टोअर यूझर इंटरफेसद्वारे उपलब्ध करून दिला जाईल.
३.१० शुल्क परतावा आणि बिलिंगसंबंधित विवाद: वेब स्टोअर वरून केलेल्या खरेदीमुळे उद्भवलेल्या बिलिंगसंबंधित विवादांसाठी Google जबाबदार नाही. बिलिंगसंबंधित सर्व समस्या या संबंधित डेव्हलपर, पेमेंट प्रोसेसर किंवा तुमची क्रेडिट कार्ड कंपनी यांपैकी जे योग्य असेल त्यांच्याकडे निर्देशित केल्या पाहिजेत.
३.११ रेटिंग, परीक्षणे आणि सपोर्टशी संबंधित समस्या पोस्टिंग धोरणे: रेटिंग आणि परीक्षणे उपयुक्त व विश्वासार्ह असण्यासाठी असतात. Chrome वेब स्टोअर वर आशयाचे परीक्षण लिहिणे हा मदतपर फीडबॅक शेअर करण्याचा आणि इतर Chrome वेब स्टोअर वापरकर्त्यांना उत्कृष्ट आशय व सेवा शोधण्यात मदत करण्याचा उत्तम मार्ग आहे.
रेटिंग आणि परीक्षणांसंबंधित Chrome वेब स्टोअर ची धोरणे खाली दिली आहेत. आक्षेपार्ह किंवा या धोरणांचे उल्लंघन करणारी परीक्षणे आणि टिप्पण्या ऑटोमेटेड व मानवी पुनरावलोकनाच्या काँबिनेशनद्वारे काढून टाकल्या जाण्याच्या अधीन आहेत आणि त्यांचे पुनःपुन्हा अथवा गंभीर उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती Chrome वेब स्टोअर वर पोस्ट करण्याची क्षमता गमवू शकते. समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही सुधारणा करून सबमिट न केल्यास, परीक्षणे किंवा टिप्पण्या अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकल्या जातील. अंमलबजावणीसंबंधित कारवाया बाय डीफॉल्ट जागतिक स्तरावर लागू केल्या जातात. तुमची अंमलबजावणीसंबंधित कारवाई प्रादेशिक निर्बंधाच्या अधीन असल्यास, तुम्हाला तसे सूचित केले जाईल.
३.११ए स्पॅम आणि फसवी परीक्षणे: तुमची परीक्षणे ही तुम्ही परीक्षण लिहित असलेल्या आशयाच्या किंवा सेवेच्या बाबतीत तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार असली पाहिजेत.
३.११बी अवांतर परीक्षणे: परीक्षणे ही विषयाला अनुसरून आणि तुम्ही परीक्षण लिहित असलेल्या आशयाशी, सेवेशी किंवा अनुभवाशी सुसंबद्ध असू द्या.
३.११सी जाहिरात करणे: आम्हाला उपयुक्त परीक्षणे हवी असतात आणि ती तुम्ही परीक्षण करत असलेला आशय किंवा सेवेव्यतिरिक्त वेगळ्या कशाचेतरी प्रमोशन करत असल्यास, ती उपयुक्त नसतात.
३.११डी हितसंबंधातील परस्परविरोध: परीक्षणे ही प्रामाणिक आणि निष्पक्षपाती असतात, तेव्हा सर्वात जास्त मौल्यवान ठरतात. ती आर्थिक फायद्याद्वारे प्रेरित नसलेल्या लोकांद्वारे लिहिलेली असावीत.
३.११ई कॉपीराइट केलेला आशय: परीक्षणे तुमची स्वतःची असली पाहिजेत आणि त्यांद्वारे तुमचे वैयक्तिक मत दर्शवले गेले पाहिजे.
३.११एफ वैयक्तिक आणि गोपनीय माहिती: परीक्षणे ही अनुभव शेअर करण्यासाठी असतात व तुम्ही संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड न करता, एखाद्या गोष्टीबद्दलचे तुमचे मत व्यक्त करू शकता.
३.११जी बेकायदेशीर आशय: तुमची परीक्षणे ही कायद्याचे आणि तुम्ही सहमती दर्शवलेल्या कोणत्याही अटींचे किंवा कायदेशीर करारांचे पालन करणारी असणे आवश्यक आहेत.
३.११एच लैंगिकदृष्ट्या भडक आशय: Chrome वेब स्टोअर हे व्यापक प्रेक्षकवर्गासाठी असून, त्यानुसार परीक्षणे असली पाहिजेत.
३.११आय द्वेषयुक्त भाषण: Chrome वेब स्टोअर हे सर्वांसाठी असून, त्यानुसार परीक्षणे असली पाहिजेत.
३.११जे आक्षेपार्ह परीक्षणे: Chrome वेब स्टोअर हे मनोरंजन आणि माहिती देण्यासाठी आहे, हल्ला व अपमान करण्यासाठी नाही.
४.१ काही उत्पादने यांमध्ये (ती Google किंवा तृतीय पक्षाने विकसित केली असली तरी) इतर Google उत्पादने आणि सेवांसोबत वापरली जाणारी वैशिष्ट्ये असू शकतात. यानुसार, तुमचा त्या उत्पादने व सेवांमधील अशा वैशिष्ट्यांचा वापर हा https://policies.google.com/terms वरील Google च्या सेवा अटी, https://policies.google.com/privacy वरील Google ची गोपनीयता धोरणे यांद्वारे, तसेच Google सेवा याच्याशी संबंधित असलेल्या सर्व लागू सेवा अटी आणि गोपनीयता धोरण यांद्वारे संचालित केला जातो.
४.२ तुमचा Google ने विकसित केलेली उत्पादने यांचा वापर हा या वेब स्टोअर सेवा अटी (Google ने विकसित केलेली उत्पादने यांसंबंधित अतिरिक्त अंतिम वापरकर्ता अटी) यामधील अनुच्छेद ८ द्वारे संचालित केला जातो.
कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्ही कोणतीही उत्पादने डाउनलोड करणे, इंस्टॉल करणे किंवा वापरणे अथवा तुम्ही केलेले या अटी यांचे उल्लंघन यांसह वेब स्टोअर च्या तुमच्या वापरामुळे उद्भवणारे किंवा गोळा होणारे कोणतेही आणि सर्व दावे, कारवाया, खटले अथवा कार्यवाही, तसेच कोणतेही व सर्व नुकसान, दायित्वे, हानी, शुल्के आणि (मुखत्याराच्या वाजवी शुल्कांसह) खर्च यांपासून व त्यांविरुद्ध Google, त्यांच्या संलग्न कंपन्या आणि त्यांचे संबंधित असलेले संचालक, अधिकारी, कर्मचारी व एजंट यांचे संरक्षण कराल, त्यांना हानीरक्षित कराल आणि क्षतिमुक्त ठेवाल.
आण्विक सुविधांचे कामकाज, जीवन रक्षक प्रणाली, आणीबाणीतील कम्युनिकेशन, एअरक्राफ्ट नेव्हिगेशन किंवा संवाद सिस्टीम, एअर ट्रॅफिक नियंत्रण सिस्टीम अथवा इतर कोणत्याही अशा अॅक्टिव्हिटी ज्यामध्ये उत्पादनांमध्ये बिघाड झाल्यामुळे मृत्यू ओढवेल, वैयक्तिक दुखापत होईल अथवा गंभीर स्वरूपात शारीरिक किंवा पर्यावरणीय हानी होईल अशाप्रकारे वेब स्टोअर किंवा कोणतीही उत्पादने वापरणे हा उद्देश नाही.
७.१ तुम्ही आणि Google मधील पूर्ण कायदेशीर कराराचा समावेश या अटींमध्ये केला आहे व त्या अटी वेब स्टोअर आणि उत्पादने यांचा तुमचा वापर संचालित करतात, तसेच वेब स्टोअर आणि उत्पादने यांसंबंधित तुम्ही व Google मधील कोणतेही पूर्वीचे करार पूर्णपणे बदलतात.
७.२ तुम्ही मान्य करता आणि सहमती दर्शवता, की Google ही पालक कंपनी असलेल्या कंपन्यांच्या गटाचा प्रत्येक सदस्य अटींचा तृतीय पक्ष हिताधिकारी असेल आणि अशा इतर कंपन्यांना फायदा (किंवा त्यांच्या बाजूने अधिकार) मिळवून देणार्या अटींच्या कोणत्याही तरतुदीची थेट अंमलबजावणी करण्याचा आणि त्यांवर अवलंबून राहण्याचा त्यांना अधिकार असेल. याव्यतिरिक्त, कोणतीही इतर व्यक्ती किंवा कंपनी या अटींची तृतीय पक्ष हिताधिकारी असणार नाही.
७.३ तुम्ही सहमती दर्शवता, की Google ला तरीही कोणत्याही अधिकार क्षेत्रात मनाईहुकूम उपायांसाठी (किंवा तशाच प्रकारच्या तातडीच्या कायदेशीर दिलाशासाठी) अर्ज करण्याची अनुमती असेल.
८.१ तुम्ही डाउनलोड करून, इंस्टॉल करून किंवा कोणतेही उत्पादन अथवा भाग (“उत्पादन) वापरून https://policies.google.com/terms वरील Google सेवा अटी आणि https://policies.google.com/privacy वरील Google गोपनीयता धोरण स्वीकारता आणि सहमती दर्शवता, की तुम्ही त्यांच्या अधीन आहात.
त्याचप्रमाणे, कोणतेही उत्पादन डाउनलोड करून, इंस्टॉल करून किंवा वापरून तुम्ही पुढील अतिरिक्त अटी आणि नियम (“अटी आणि नियम”) स्वीकारता व त्यांना सहमती दर्शवता.
८.२ उत्पादन याच्या अशा वैशिष्ट्यांचा तुमचा वापर हा https://www.google.com/chrome/terms/ वरील Google Chrome व Chrome OS च्या अतिरिक्त सेवा अटी आणि https://www.google.com/chrome/privacy/ वरील Chrome गोपनीयता नोटिस यांद्वारे, तसेच नोटिस न देता वेळोवेळी अपडेट केल्या जाणाऱ्या कोणत्याही लागू असलेल्या Google सेवा याच्याशी संबंधित सेवा अटी आणि गोपनीयता धोरण यांद्वारे संचालित केला जातो. तुम्ही उत्पादन याचा वापर पुढे सुरू ठेवल्यास, या अटी आणि नियम, तसेच परिच्छेदामध्ये सूचीबद्ध केलेल्या अटींशी तुम्ही सहमत आहात असे मानले जाते. तुम्ही सहमत नसल्यास, कृपया उत्पादन वापरणे थांबवा.
८.३ हे उत्पादन, याच्याशी संबंधित आशय आणि दस्तऐवजीकरण संपूर्णपणे खाजगी निधीमधून विकसित केले गेले आहे. उत्पादन याचा वापरकर्ता हा युनायटेड स्टेट्स सरकारची एखादी एजन्सी, विभाग, कर्मचारी किंवा इतर संस्था असल्यास, तांत्रिक डेटा अथवा मॅन्युअलच्या समावेशासह उत्पादन याचा वापर, त्याचे डुप्लिकेशन, रीप्रोडक्शन, रिलीझ, फेरबदल, डिस्क्लोजर किंवा ट्रान्सफर या अटी आणि नियम यांमध्ये असलेल्या अटी, नियम व करार यांद्वारे प्रतिबंधित आहे. नागरी संस्थांसाठी फेडरल प्राप्ती नियमन १२.२१२ यानुसार आणि सैनिकी संस्थांसाठी संरक्षण फेडरल प्राप्ती नियमन पुरवणी २२७.७२०२ यानुसार, या अटी आणि नियम यांद्वारे उत्पादन याचा वापर प्रतिबंधित केला आहे.
८.४ Google हे एखादे उत्पादन Google डेव्हलपर अटींचे किंवा इतर कायदेशीर करार, कायदे, नियमने किंवा धोरणांचे उल्लंघन करत आहे असे वेळोवेळी निर्धारित करू शकते. तुम्ही सहमती दर्शवता, की अशा वेळी Google त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार तुमच्या सिस्टीमवरून ती उत्पादने रिमोट पद्धतीने बंद करण्याचा किंवा काढून टाकण्याचा हक्क राखून ठेवते. Google Chrome हे रिमोट सर्व्हरवर उत्पादने यांच्या उपलब्ध अपडेट वेळोवेळी तपासू शकते, ज्यांमध्ये बग फिक्स किंवा वर्धित कार्यक्षमतेचा समावेश आहे पण त्यापुरतेच मर्यादित नाही. तुमच्या ब्राउझरमध्ये ही कार्यक्षमता असल्यास, तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्हाला नोटिस न देता अशा अपडेटची आपोआप विनंती केली जाईल, ती डाउनलोड केली जातील आणि इंस्टॉल केली जातील.
८.५ खाली नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही किंवा Google द्वारे या अटी आणि नियम समाप्त केले जाईपर्यंत ते लागू असतील. तुम्ही तुमच्या सिस्टीम किंवा डिव्हाइसवरून हे उत्पादन पूर्णपणे कायमचे हटवून या अटी आणि नियम कधीही समाप्त करू शकता. तुम्ही या अटी आणि नियम यांच्या कोणत्याही तरतुदीचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, तुमचे अधिकार आपोआप व त्वरित Google किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे नोटिस न देता काढून टाकले जातात. अशा वेळी, तुम्ही तात्काळ उत्पादन हटवणे आवश्यक आहे.
८.६ कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, तुम्ही सहमती दर्शवता, की तुम्ही डाउनलोड करणे, इंस्टॉल करणे किंवा तुम्ही केलेले या अटी आणि नियम यांचे उल्लंघन यांसह उत्पादन याच्या तुमच्या वापरामुळे उद्भवणारे अथवा गोळा होणारे कोणतेही व सर्व दावे, कारवाया, खटले किंवा कार्यवाही, तसेच कोणतेही आणि सर्व नुकसान, दायित्वे, हानी, शुल्के व (मुखत्याराच्या वाजवी शुल्कांसह) खर्च यांपासून आणि त्यांविरुद्ध Google, त्यांच्या संलग्न कंपन्या व त्यांचे संबंधित असलेले संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांचे संरक्षण कराल, त्यांना हानीरक्षित कराल व क्षतिमुक्त ठेवाल.
८.७ उत्पादनाचा उद्देश आण्विक सुविधांचे कामकाज, जीवन रक्षक प्रणाली, आणीबाणीतील कम्युनिकेशन, एअरक्राफ्ट नेव्हिगेशन किंवा संवाद सिस्टीम, एअर ट्रॅफिक नियंत्रण सिस्टीम अथवा इतर कोणत्याही अॅक्टिव्हिटी ज्यामध्ये उत्पादनामध्ये बिघाड झाल्यामुळे, मृत्यू ओढवेल, वैयक्तिक दुखापत होईल अथवा गंभीर स्वरूपात शारीरिक किंवा पर्यावरणीय हानी होईल अशाप्रकारे वापरणे हा नाही.
८.८ या अटी आणि नियम व संदर्भाद्वारे समाविष्ट केलेल्या इतर अटींमध्ये उत्पादन याच्याशी संबंधित तुम्ही आणि Google मध्ये केलेल्या कराराचा समावेश आहे व तुमचा उत्पादन याचा वापर याद्वारे संचालित केला जातो आणि उत्पादन यासंबंधित तुम्ही व Google मध्ये केलेले पूर्वीचे किंवा समकालीन करार त्या पूर्णपणे बदलतात.
८.९ तुम्ही सहमती दर्शवता, की Google ला कोणत्याही अधिकार क्षेत्रात मनाईहुकूम उपायांसाठी (किंवा तशाच प्रकारच्या तातडीच्या कायदेशीर दिलाशासाठी) अर्ज करण्याची अनुमती असेल.